Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सलमान खानवर भारी पडला 'ढाई किलो का हात', सनी देओलच्या 'जाट'ची 'सिकंदर'पेक्षा तगडी कमाई

73

Sunny Deol Jaat Vs Salman Khans Sikandar: सनी देओलच्या ‘जाट’ सिनेमाने सलमान खानच्या ‘सिकंदर’ला स्पष्टपणे धूळ चारल्याचे चित्र बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: बॉक्स ऑफिसवर सध्या दोन सुपरस्टारचे चित्रपट एकमेकांना टक्कर देत असल्याने चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येत आहे. सलमान खानचा ‘सिकंदर’ आणि सनी देओलचा ‘जाट’ हे चित्रपट मैदानात आमनेसामने आहेत. या सिनेमांची एकमेकांसोबत स्पर्धा सुरू असताना, भाईजानचा सिनेमा मागे पडतो आहे. तिसऱ्या दिवशी सनी देओलने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ज्यामुळे ए.आर. मुरुगादोस यांच्या ‘सिंकदर’ची अवस्था पार बिकट झाली आहे. रविवार १२ एप्रिल रोजी दोन्ही चित्रपटांनी किती कमाई केली हे घ्या जाणून…

३० मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सिकंदर’ने १३ व्या दिवशी म्हणजे दुसऱ्या शुक्रवारी फक्त ३० लाख रुपये कमावले. तर, १० एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या ‘जाट’ने दुसऱ्या दिवशी ११ एप्रिल रोजी शुक्रवारी ७ कोटी रुपये कमावले. अशा परिस्थितीत कोणाचे पारडे जड आहे, हे स्पष्टपणे दिसून आले. सलमान खानच्या चित्रपटाची सुरुवात दमदार झाली असली तरी, त्यानंतर सिनेमाची कमाई ढेपाळत गेली. त्या तुलनेत, सनी देओलच्या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई काहीच नव्हती. कारण ‘जाट’ने तीन दिवसांत मिळून २६ कोटीचा आकडा गाठला, तर ‘सिकंदर’ने पहिल्याच दिवशी ही कमाई केली होती.

Krrish 4 साठी प्रियांका चोप्राने किती कोटींची केली मागणी? अभिनेत्रीचे मानधन ऐकूनच चक्रावाल

‘जाट’ आणि ‘सिकंदर’ने किती केली कमाई?

‘जाट’ सिनेमाने तिसऱ्या दिवशी म्हणजेच पहिल्या शनिवारी सुमारे १० कोटी रुपये कमावल्याचे सांगितले जाते आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यामुळे या चित्रपटाने तीन दिवसात एकूण २६.५० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तर रीलिनंतर दुसऱ्या शनिवारी सिकंदरचे कलेक्शन जवळपास ४० लाख रुपये आहे. आतापर्यंत ‘सिकंदर’ने १०८.४७ कोटींची कमाई केली आहे. Sacnilk ने याविषयी वृत्त दिले आहे.

या दोन्ही सिनेमांना आगामी काळात अक्षय कुमारच्या ‘केसरी २’चे आव्हान आहे. १८ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची आधीपासूनच चर्चा आहे. जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. त्यामुळे ‘जाट’ला सलमानपासून धोका नसला तरी, अक्षयचा सिनेमा धोकादायक ठरू शकतो.

जान्हवी भाटकर

लेखकाबद्दलजान्हवी भाटकरजान्हवी भाटकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. डिजिटल आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये ५ वर्षांचा अनुभव. ‘न्यूज १८ लोकमत’मधून डिजिटल मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात. ऑनलाइन माध्यमांमध्ये ३ वर्ष कार्यरत. मनोरंजन, लाइफस्टाइल आणि अर्थ विषयात आवड.आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.